
तुमसर तालुक्यातील खरबी येथिल रक्तरंजित थरारक घटना
भंडारा प्रत्रिका प्रतिनिधी:खापा /तुमसर :येथून 3किलोमीटर अंतरावर असलेल्या तुमसर तालुक्यातील खरबी येथे घरगुती वादातून मुलाने आपल्या जन्म दात्या बापाच्या डोक्यावर फावड्याने जबर प्रहार निघृण हत्या केल्याची रक्तरंजित थरारक घटना २९ मे रोजी रात्री दहा च्या दरम्यान घडली. तुकडु बावणे (६०) असे मृतक बापाचे नाव आहे.तर गणेश तुकडू बावने(३३)रा .खरबी असे आरोपी मुलाचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी शुक्रवारी मृतक वडील तुकडू बावणे व मुलगा गणेश हे रात्री घरी असताना दोघांत घरगुती शुल्लक वादातुन जोरदार कडाक्याचे भांडण झाले. सदर भांडण ऐवढा विकोपाला गेला की मुलगा गणेशने वडील तुकडु च्या डोक्यावर घरच्या बांधकामांवरील फावड्याने जोरदार प्रहार करून जागिच मुडदा पाडला.सदर रक्तरंजित थरारक घटना घडल्यावर आरोपी मुलगा गणेश यांने घटनास्थळावरून पळ काढुन मोहाडी पोलीस स्टेशन गाठत पोलीसांना आत्मसमर्पण केले. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरीकानी एकच गर्दी केली होती.

आरोपी मुलगा व मृतक वडील हे घरात एकत्र राहत होते.आरोपी गणेश हा विवाहीत असुन पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.तर मृतक तुकडु आरोपी गणेश कडे राहत होता तर त्याची पत्नी दूसऱ्या मुलांकडे वास्तव्यात होती.
मृतक तुकडु बावणेला पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तर आरोपी मुलगा गणेश बावणे याला खूणाच्या गुन्ह्याखाली मोहाडी पोलीसांनी अटक केली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास मोहागी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस करीत आहेत.
आरोपी गणेश बावणे यांनी मध्यस्थि करण्यास गेलेल्या पुतण्या आर्यन बावणे वय १५ वर्षे यालासुद्धा लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
सदर घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.