पल्स पोलिओ,नियमित लसीकरण व जिल्हा टास्क फोर्स सभा संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी आणि विविध राष्ट्रीय आरोग्य मोहिमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दि. २७ मे २०२६ रोजी मा अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्या दालनात जिल्हा टास्क फोर्स अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. सदर बैठक अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे आणि विविध संबंधित विभागांचे विभाग प्रमुख,अधिकारी व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर सविस्तर आढावा घेऊन अति मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांनाआवश्यक निर्देश दिले: जिल्ह्यातील माता व बाल आरोग्य सुधारणे, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे, सँम-मॅम बालकांचे वजन वाढविणे, कुपोषण आणि आरोग्य सेवांमधील तांत्रिक व व्यावहारिक त्रुटी तातडीने दूर करणे, याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *