भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दोन गावांना जोडणारा मुख्य रस्ता मोहाडी तालुक्यातील रोहणा ते भंडारा तालुक्यातील इंदूरखा रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने सदर ठेकेदाराने नागरिकांना जाण्यायेण्यासाठी दुसरा कच्चा पुल तयार करून दिला होता. तो पुल पहिल्याच पावसात वाहून गेला. पुल वाहून गेल्याने रोहणा ते इंदूरखा हा मार्ग १५ दिवसापासून पूर्णत: बंद झाला असतानाही प्रशासन नागरिकांचा अंत पाहत आहे. गुरुवार दिनांक ६ आॅगस्ट सायंकाळी ५ वाजे दरम्यान भंडारा जिल्हाधिकारी हे इंदूरखा येथे खनिज निधीतून बांधण्यात आलेल्या शाळेतील ईमारत, आणि शाळेच्या बाजूची इमारत बघण्यासाठी आले असता. इंदुरखा येथील गावकºयांनी वाहून गेलेला पूल आणि रोहना – इंदूरखा बंद असलेला रस्ता पाहण्याची विनंती केली. मात्र ही मागणी जिल्हाधिकारी यांनी धुडकावून लावली.
यावरून असे लक्षात येते की, प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी किती तत्पर आहे. ठेकेदाराने सदर पुलाचे काम थातूरमातुर केल्याने हा पूल वाहून गेला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा २ आशियाई विकास बँक (एडीबी) टप्पा – २ अर्थसहाय्य अंतर्गत राज्य मार्ग ३५५ दहेगाव ते रोहणा तालुका सीमा रस्त्यावर सा. क्र. ३/६०० मध्ये रोहणा ते इंदूरखा रस्त्याच्या मधोमध नाल्यावर पुलाचे बांधकाम मंजूर झाले असून प्रशासकीय मान्यता ५ कोटी ९६ लक्ष ७२ हजार रुपयाची आहे. तर निविदा रक्कम ३ कोटी १६ लक्ष ७२ हजार रुपये आहे. निविदेमध्ये हे काम वेदांत कन्स्ट्रक्सन भंडारा यांना मिळाले आहे. नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने नवीन पुलाच्या कामाच्या बाजूने लोकांना जाण्यायेण्यासाठी जुन्या तुटल्या फुटल्या पायल्या घालून त्यावर माती घातली आणि निकृष्ठ पूल तयार केले यामुळे हे पुल पूर्णत: वाहून गेले. बुधवार दिनांक ५ आॅगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे प्रमुख अधिकारी आरिफ शेख, अभय मुरकुटे यांच्याशी रोहणा ते इंदुरखा रस्ता बाबत तासभर चर्चा उमेश मोहतुरे यांनी केली. तात्काळ काहीतरी मार्ग काढा असेही यावेळी मोहतुरे अधिकाºयांना बोलले, गावकºयांच्या व्यथा समजावून सांगितल्या.
विशेष म्हणजे रुग्णांचे काय?, पण हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी ठेकेदाराकडून काम करून घेण्याऐवजी त्या ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत, असेही यावेळी उमेश मोहतुरे यांनी सांगितले. स्वत:चे कामचुकारपणा दाबण्यासाठी गावात फलक लावले अशी चर्चा जनतेमध्ये आहे. तक्रार करायची असेल तर सरपंचाला करा. मग अशा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनाच्या अधिकाºयांची काय जिम्मेदारी असेल? जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच सांगा ? जिल्हाधिकारी भंडारा यांनी या विषयाची चौकशी करावी. इंदूरखा ते रोहणा हा मार्ग पूर्णता बंद झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी, कामगार, बाजार करणारे, दुग्ध व्यवसाय, विशेष म्हणजे रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भंडारा आणि मोहाडी येथे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्याने ह्या रस्त्याने मोठी वर्दळ राहायची. आता लोकांना फेºयाच्या रस्त्याने जाणे येणे करावे लागत आहे.
रोहणा गावाकडून भंडाराकडे रोज जाणारे, इंदूरखा कडून दाभा, वरठी मोहाडी असा मार्ग आहे. मजूर, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी आणि ईतर नागरिक हे पुलाच्या त्या बाजूला आपल्या दुचाकी ठेवतात आणि तुटलेल्या पुलाच्या बाजूने पाण्यातून प्रवास करून त्या बाजूला जातात. तसेच भंडारा, इंदूरखा कडून रोज येणारे नागरिक हे रोहना गावाकडील बाजूस आपल्या दुचाकी ठेवतात आणि पाण्यातून प्रवास करून आपली दिनचर्या चालवतात. यावेळी नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नवीन पुलाचे काम “बिलो” मध्ये असल्याने ठेकेदार या पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे व संथगतीने करीत आहे. त्यामुळे नवीन पुलाचे काम अपूर्ण आहे. नवीन पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी १ वर्ष लागणार असल्याने हा मार्ग कुठ पर्यंत बंद राहील असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. संथगतीने व बोगस पुलाचे बांधकाम करणाºया ठेकेदाराचा परवाना रद्द करून सदर कामाचे देयके थांबविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी भंडारा यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तासभर चर्चा करून उमेश मोहतुरे, नितेश मारवाडे, सुनिल मेश्राम, गणेश मोहतुरे, रोहना व इंदुरखा येथील नागरिकांनी केली आहे.