अखेर मादी बिबट्यासह दोन छाव्यांना केले जेरबंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बीबीटोला येथे काही दिवसांपूर्वी शेतात काम करणाºया शेतकºयावर हल्ला करणाºया मादी बिबट्यासह तिच्या दोन छाव्यांना अखेर वन विभागाने जेरबंद केले आहे. वन विभाग, पोलीस विभाग आणि गावकºयांच्या मदतीने रात्री चाललेल्या मोहिमेनंतर ही यशस्वी कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी बीबीटोला येथे राजभुवन भैयालाल अंबुले हे शेतकरी शेतात काम करीत असताना मादी बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर मादी बिबट्याचा कुत्र्यांनी पाठलाग केला असता ती जवळच्या झाडावर चढून बसली होती. त्या घटने आधी काही दिवसांपूर्वी शेतकºयांना शेत शिवारात बिबट्याची दोन पिल्ले आढळली होती. ती पिल्ले ग्रामस्थांनी घरात आणली होती. नंतर वनविभागाच्या माध्यमातून ती पिल्ले पुन्हा जंगलात सोडण्यात आली होती.

मात्र त्यानंतर तीच मादी बिबट्या आपल्या बछड्यांसह परिसरात परत आली. राजभुवन भैयालाल अंबुले यांच्या शेताला लागून असलेल्या परिसरात शेतात काम करत असताना पुन्हा हल्ल्याची शक्यता निर्माण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर वन विभागाने मादी बिबट्याचा शोध सुरू केला होता. तिला दोन पिल्ले असल्याची माहिती मिळाल्याने तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. काल रात्रीच्या सुमारास वन विभागाचे २० ते २५ कर्मचारी अधिकारी, पोलीस विभागाचे १५ कर्मचारी आणि गावकºयांच्या मदतीने सापळा रचून त्या मादी बिबट्यासह तिच्या दोन्ही पिल्लांना पकडण्यात वन विभागाला यश आले. पकडण्यात आलेल्या मादी बिबट्या आणि तिच्या दोन्ही छाव्यांना पुढील उपचार आणि देखभालीसाठी नागपूर येथील गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात पाठविण्यात येणार आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. वन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *