गणेशपूरचा राजा सन्मित्र गणेश मंडळ येथे लोकसंवाद

आपत्तीच्या काळात जिल्हा नियंत्रण कक्षाची हेल्पलाईन नागरिकांसाठी मदतीचा आधार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

भंडारा : आपत्कालीन परिस्थिती तसेच नैसर्गिक किंवा इतर आपत्तीच्या काण्यात नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत २५१२२२ हा हेल्पलाईन क्रमांक तसेच चॅटबॉट्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकटाच्या वेळी नागरिकांनी या सुविधाचा वापर करून प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदासी यांनी केले.

गणेशपूरचा राजा सन्मित्र गणेश मंडळमध्ये आज जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला गणेश मंडळाचे अध्यक्ष राजकुमार मेश्राम, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विजय जाधव यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी २५१२२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक ती मदत व माहिती मिळवता येणार आहे. आपत्तीच्या काण्यात नागरंपर्यंत प्रशासनाची मदत जलदगतीने पोहोचविण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.

आपत्तीमध्ये मानवी हानी, जनावरांच्या हानी तसेच घरांचे नुकसान झाल्यास शासनाच्या निकषामानुसार संबंधितांना मदत देण्यात येते. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा तसेच उपलब्ध चॅटबॉट सुविधेचा वापर करावा, असे आवाहन यावेळी देण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *