SIR संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन यांच्या सूचनेनुसार रकफ संदर्भात तसेच इछअ यांच्या कायार्चा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भंडारा येथील तिलक वॉर्डातील पक्ष कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे आणि प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीत इछअ आणि इछड यांच्यात योग्य समन्वय साधून मतदार यादीच्या कामात त्यांना आवश्यक सहकार्य करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच रकफ प्रक्रियेसंदर्भात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वगळण्यात आलेले मतदार तसेच मतदारांच्या नावांमध्ये आढळणाºया विसंगतींबाबत माहिती दिली.

प्रत्येक तालुकाध्यक्षाने आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय गावांमध्ये बैठका घेऊन बूथस्तरा वरील मतदार याद्यांची माहिती तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. यावेळी सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांना प्रारूप मतदार याद्या वितरित करण्यात आल्या. येत्या सात दिवसांत खासदार प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील रकफ प्रक्रियेचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाºयांनी आपल्या-आपल्या क्षेत्रातील कामाला गती देण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीलाहेमंत महाकालकर, नरेंद्र झंझाड, देवचंद ठाकरे, विजय सावरबांधे, राजू पटेल, यशवंत सोनकुसरे, उमेश तुरकर, योगेश सिंगनजुळे, बालूभाऊ चुन्ने, पवन चव्हाण, नागेश भगत, धनराज चौधरी, मंजुषा बुरडे, धनु व्यास, सदाशिव ढेंगे, गणेश चौधरी, अंगराज समरीत, उत्तम कडपाते, मनीष वासनिक, भानुदास बनकर, आशिष नंदागवळी, कीर्ती गणवीर, अमन मेश्राम, शुभम सार्वे, संजय नहाले, मंगेश रेहपाडे, महेश भोंगाडे, लता मेश्राम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *