
गडचिरोली : अहेरी नगरपंचायतीच्या विद्युत कामांच्या कंत्राटापोटी एक लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपवरून अहेरी नगरपंचायतीतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी रंगेहात पकडले. अहेरीच्या मुख्य बाजारपेठेत दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.