हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलीसांची धाड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अड्याळ पोलीसांनी अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकुन ९ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपीविरोधात पोलीसांत गुन्हा नोंद केला. जिल्हयातील अवैध धंदयाचा नायनाट करण्याचे उदिष्टाने जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी पोलीस अधिकाºयांना आदेष देवुन पोलीस स्टेशन स्तरावर दारु व जुगार या अवैध धंदयाबाबत धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. दिनांक ३ सप्टेंबर रोजी पोलीस अडयाळ येथे अड्याळ पो.स्टे.ठाणेदार श्री.बोरकुटे व त्यांच्या अधिनस्थ कर्मचाºयांनी अड्याळ येथील जितेश मंगेल वानखेडे वय ३३ वर्षे , सचिन किषन चाचेरे वय ३० वर्षे रा. सातेवाडा येथे धाड टाकुन ८ प्लास्टिक हिरव्या पांढ-या रंगाच्या बॉटल प्रत्येकी २ लिटर हा. भ. दारुने भरुन असलेल्या किंमती २०० असा एकुण १६ लिटर हा. भ. दारु किंमती १६०० रु. , ४ प्लॉस्टिक ड्रम मध्ये प्रत्येकी ड्रम मध्ये २० किलो सडवा मोहापास प्रति किलो ५० रु प्रमाणे एकुण ८० किलो सडवा मोहापास किंमती ४ हजार, भट्टी जवळ अंदाजे ५० किलो जलाऊ काडया किंमती २ हजार,२ खाली लोखंडी ड्रम किंमती २ हजार रूपये किंमत ८ हजार रू. असा एकुण ९ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपीविरोधात अड्याळ आल्याने पोलीस स्टशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी व अपर पोलीस अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनात, अड्याळ ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक श्री. बोरकुटे व कर्मचारी यांनी केली .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *