जिल्हा पोलीस उपअधिक्षक विजय डोळस गुणवत्त्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्यातील ११४ अधिकारी व अंमलदार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दिनांक १३ आॅक्टोबर २०२२ रोजी राज भवन येथे, पोलीस शौर्य पदक व उल्लेखनीय सेवा बद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवंत्तापुर्ण पोलीस पदक प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थितीत राज भवन येथे २०२० च्या स्वातत्र्यदिनी तसेच २०२१ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेले पोलीस पदक ११४ अधिकारी व जवानाना पुर्ण सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. या सोहळयात भंडारा जिल्हा विजय डोळस पोलीस उपअधिक्षक (गृह) यांनासुध्दा गुणवंत्तापुर्ण सेवा बद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक देवुन गौरविण्यात आले आहेत. सदर कार्यक्रम मध्ये पोलीस महासंचालक रजनींश सेठे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरीक्त मुक्त सचिव (गृह) आनंद लिमये व अन्य अधिकारी हजर होते.

विजय चितांमन डोळस पोलीस उपअधिक्षक (गृह) भंडारा यांचा जन्म १ जून १९६७ रोजी झाला. तसेच महाराष्ट्र पोलीस दलात १५ सप्टेंबर १९९३ ला पोलीस विभागात नियुक्त झाल्यानंतर १० वर्षे अमरावती ग्रामीण व शहर, बडनेरा, अंजनगाव सुर्जी, प्रेझरपुरा, येथे कर्तव्य बजावलेला आहे. कोकण परीक्षेत्रात रायगड जिल्हात राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई, तसेच ठाणे शहर आयुक्तालय विद्धलवाडी, मध्यवर्ती पोलीस ठाणे उल्लासनगर तसेच भिवंडी शहर, निजामपुर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्तव्य बजावले आहे. त्यांनी आतापर्यत २९ वर्षे सेवामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा अश्या गंभिर गुन्हयाचे तपास करुन त्यांनी आरोपीतांना शिक्षेस पात्र केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता मोलाची कामगिरी केली आहे. त्यांना त्याचे कार्यकाळात पोलीस विभागात मा. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह २०१७ प्राप्त झाले आहे व ३५० पेक्षा जास्त बक्षीस प्राप्त झालेले आहेत. दिनांक १५ डिसेंबर २०२१ पासुन भंडारा जिल्हयात पोलीस उपअधीक्षक (गृह) व उपविभागीय पोलीस अधीकारी साकोली येथील अतिरीक्त कार्यभार त्यांचेकडे सोपविण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचाºयांशी समन्वय साधुन कर्तव्याची जाणीव करुन देत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *