राज्यातील ११ जिल्ह्यांना मिळाले नवे पालकमंत्री

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली. डॉ.विजयकुमार गावीत यांच्याकडे भंडाराचे नवे पालकमंत्री म्हणुन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पुर्वी ही जबाबदारी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देंवंद्र फडणवीस यांच्याकडे होती.जिल्हा स्थानिक पालकमंत्र्यांच्या बाबतीत नेहमीच दुदैवी ठरला आहे. भंडाराला काही काळ का होईना स्थानिक पालकमंत्री मिळतील, अशी अशा जिल्हावासी बाळगून होते. मात्र त्यांचा भ्रमनिराश झाला. अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर व तुमसरचे राष्टÑवादीचे आमदार राजु कारेमोरे यांची पालकमंत्री पदासाठी नावे चर्चेत होती. पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे : पुणे-अजित पवार,अकोला-राधाकृष्ण विखे- पाटील, सोलापूर-चंद्रकांत पाटील,अमरावती- चंद्रकांत पाटील, भंडारा-विजयकुमार गावित,बुलढाणा- दिलीप वळसे- पाटील,कोल्हापूर – हसन मुश्रीफ,गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम,बीड – धनंजय मुंडे,परभणी – संजय बनसोडे, नंदूरबार – अनिल भा. पाटील,वर्धा – सुधीर मुनगंटीवार

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.