कोंडा येथे दिव्यांग प्रमाणपत्राचे नुतनिकरण शिबीर संपन्न

भंडारा : प्राथमीक आरोग्य केंद्र कोंडा तज्ज्ञ डॉ. प्रदीप आनंद, नेत्रातज्ज्ञ डॉ. येथे २७ एप्रिल रोजी तालुका स्तरीय दिव्यांग शिबीर व प्रमाणपत्र नुतुनिकरण शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरजी जीभकाटे तर प्रमुख पाहुणे सरपंच अमीत जीभकाटे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती पवनीच्या सभापती डॉ.नूतनताई कुरझेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सामान्य रुग्णालय भंडारा येथील डॉ. पियुष जक्कल, नाक कान घसा वाघाये, मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. साखरे, भौतिक उपचार डॉ. प्रीती चोले, थेरपीस्ट अमोल मानकर यांनी या शिबीरामध्ये २००0 दिव्यांग रुग्णाची तपासणी केली. या कार्यक्रमाकरिता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैकाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल बोरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. घोडेस्वार व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *