माजी आमदार चरण वाघमारे यांचा बीआरएस मध्ये प्रवेश

 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : भाजपाचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश हैदराबाद येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी झाला. मागील अनेक दिवसांपासून चरण वाघमारे यांच्या बीआरएस पक्षात प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला. हैदराबाद येथे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी बिआरएस पक्षाचा दुपट्टा घालून मुख्यमंत्र्यांनी चरण वाघमारे यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्यातील इतरही अनेक कार्यकर्त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश घेतला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *