शिक्षणासोबत पर्सनालिटी डेव्हलअपमेन्ट आजची गरज – बी. वैष्णवी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नुकताच सेंट जॉन मायनॉरिटी इंग्लिश मिडीयम स्कूल तुमसर येथे शालेय स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात चीफ गेस्ट बी. वैष्णवी मॅडम यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणातून मुलांना खूप सुंदर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्रीमती मीरा भट्ट, ज्येष्ठ समाजसेविका, लायन महेश लिमजे प्रेसिडेंट लायन क्लब गोल्डन, सौ अर्चना डुंभरे तुमसर शहर अध्यक्ष नॅशनल ह्युमन राईट्स फेडरेशन रेणू गीडी यन प्रिन्सिपल सेंट जॉन स्कूल, जॉन्सन गिडीयन संचालक सेंट जॉन स्कूल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. दिप प्रज्वलन करुन तसेच चीफ गेस्ट यांच्या हस्ते शाळेचा झेंडा फडकवून रिबीन कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अनूप गिडीयन यांनी केले. कार्यक्रमात पीटी, रीले विविध स्पर्धा घेण्यात आल्या. रेड, यलो, ब्लू, ग्रीन हाउज यांनी सुंदर प्रदर्शन केले. किंदर गार्डन पासून सर्वांनी सहभाग घेतला. कोरोनाच्या आधी रोड सेμटीचा कार्यक्रमात ड्रॉइंग स्पर्धा घेण्यात आली होती.

अनिल मलेवार हिरो होंडा एजंसी तुमसर, मीरा बहुउद्देशीय महिला संस्था, हितेंजू बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून घेण्यात आली होती. त्याच सर्टिफिकेट वितरण चीफ गेस्ट वैष्णवी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. मीरा भट्ट यांनी बाल मजुरी व जिल्ह्यात वाढते क्राईम कमी वयातील मुले वाईट मार्गाला जात आहेत, यावर प्रकाश टाकला. आई इतकेच प्रेम शिक्षक सुद्धा आपल्या विद्यार्थ्यावर करतात, मात्र मुले शिक्षण घेवून मोठे होतात डॉ. इंजनियर, अनेक क्षेत्रात काम करतात. मात्र शिक्षक इथेच असतात म्हणून आपल्या गुरूला आणि गुरू विद्या विसरू नका चु कीच्या मार्गाला जाऊ नका, मोठे होऊन चागले नाव शाळेचं आणि आपल्या पालकांचं नाव कमवा, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. आभार प्रदर्शन रेणू गिडीयन मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता विद्यार्थी, शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमात पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *