शिवसेनेचे ५७ वर्धापन दिन उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : छञपती शिवाजी महा- राज यांच्या व हिंदुहृदय सम्राट बाळ- ासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतीमेस माल्यार्पण करुन जयघोष करण्यात आले. येणा-या तुमसर शहर नगरपरीषद निवडुक लक्षात घेता प्रभाग निहाय शाखा व बुथ प्रमुख यांची नियुक्ति करण्यात येणार असुन जिल्हाप्रमुख यांच्या आदेशाप्रमाणे शिवसेना शहर तुमसर कार्यकारणी मध्ये बदल करुन जे पदाधिकारी संघठनेला वेळ देऊ शकत नाही. त्यांच्या पदावर नविन शिवसैनिकांची नियुक्ति करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे ‘गाव तिथ शाखा व घर तिथ शिवसैनिक’ या अनुसंगातुन बरेचफेरबदल करण्यात येणार असुन नगरपरीषद तुमसर येथे शिवसेनेचे जास्तीत जास्त जनप्रतिनिधी जाऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द राहणार.

या प्रसंगी प्रामुख्याने शिवसेना भंडारा जिल्हा संघटक किशोर चौधरी, आमदार अनील बावनकर, उपेश बान्ते, शिवसेना शहर प्रमुख नितीनभाऊ सेलोकर, विभाग प्रमुख फिरोज पठाण, भोजराज वंजारी, असलम पठाण, संजय डोये, नितीन राउत, विनोद आगाशे, अरुण डांगरे, केशव रहांगडाले, सलीम पठाण, गोपाल पाटील, भरत चन्ने, अनील सिगांडे, अनील पडोळे, विकास बडवाईक, राकेश बडवाईक व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *