६२ लोकांना सुधारित चुल वाटप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहर व ग्रामीण येथील ६२ नागरिकांना सुधारित चुल वाटप कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, तुमसर येथे नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगर सेवक किशोर हरीरामजी भवसागर, सामाजिक कार्यकर्ता राजेश कांबळे, सामजिक कार्यकर्ता आशिष कांबळे, भा.बौध्द महासभाचे तालुका अध्यक्ष विजय वाघमारे, मिनाक्षी वाघमारे, किशोर माटे सामजिक कार्यकर्ता, रीना माटे, रेखा चंद्रिकापुरे, हिरा वासनिक, आलोक बन्सोड, यादोराव बोरकर बपेरा, मोनु तुरकने तुमसर, उज्ज्वल बन्सोड, तालुका समन्वय तुमसर तथा संचालक आपले सरकार सेवा केंद्र तुमसर, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला सर्व समाजबांधवांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व हितचिंतकांचे आणि सर्व समाजबांधवांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.