शासकीय कर्मचाºयांच्या संपामुळे कार्यालयीन कामे ठप्प

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जुनी पेन्शन लागू करण्यासाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाºयांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे गोंदियातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाल्याचे चित्र आहे. शिक्षण, आरोग्य, महसूल, कृषी आदी बहुतांशी सेवांवर संपाचा परिणाम दिसून येत आहे. संपात शहर व जिल्ह्यातील सुमारे ३० हजार कर्मचारी सहभागी झाल्याच्या दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळत आहे. कामकाज ठप्प झाले असून कर्मचारी संघटना आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. संपात राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नगर पालिका, नगर पंचायतमधील कर्मचारी व शिक्षक संघटना सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासून शासकीय सेवेत येणाºया कर्मचाºयांना नविन राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) लागू केली आहे. ही योजना अन्यायकारक असून सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सातत्याने विविध आंदोलन करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.