‘त्या’ रस्ता बांधकामांचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी देवरी : देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाºया मुल्ला ग्रामपंचायत येथे मनरेगा योजने अंतर्गत कोट्यवधींच्या निधीतुन रस्ता बांधकाम करण्यात येत आहे. बांधकाम निकृष्ट, नियमबाह्य व अपुºया साहित्याच्या वापराने होत असल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली होती तसेच यासंदर्भात ‘मुल्ला’ येथे मनरेगाच्या कामांत गौडबंगाल या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत देवरी पंसचे खंडविकास अधिकारी यांनी रस्ता बांधकामांच्या चौकशीचे निर्देश पंचायत समितीचे शाखा अभियंता डी. एस. सोमलवार व स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक आर. एल. साबळे यांना दिले होते. चौकशी होऊन दहा-बारा दिवस लुटले असतानाही यदर अहवाल तक्रार कर्त्यापर्यंत पोहोचला नसल्याने चौकशी संशयाच्या भौवयात असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. ग्रामपंचायत मुल्ला येथे मनरेगा योजना अंतर्गत गावात विविध ठिकाणी कोट्यवधींच्या निधीतुन रस्त्यांचे खडीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामवर मंजूर अंदाजपत्राकानुसार कुठेही बांधकाम होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर ग्रामस्थांनी देवरी पंसकडे तक्रार केली. यानंतर खंडविकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश पंचायत समितीचे शाखा अभियंता डी. एस. सोमलवार व स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक आर. एल. साबळे यांना दिले. संबंधित अधिकाºयांनी अहवाल तयार केला आहे परंतु हा अहवाल अद्यापही तक्रार कर्त्यापर्यंत पोहोचला नसल्याने कुठे रस्त्यातील भ्रष्टाचार दडपला तर जात नाही ना अशी संख्या ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *