गोंदियात हॉटेलच्या खाली ठेवलेल्या गाडयांना प्रेटोल टाकून केली जाळपोळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया शहरातील रामनगर पोलिस ठाण्यांअंतर्गत असलेल्या रेल टोली गुजराती नॅशनल शाळेसमोर असलेल्या पॅसिफिक हॉटेलच्या खाली कामगाºयांच्या चार दुचाकी काही समाजकंटकांनी जाळपोळ केल्याची, घटना पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीला पेट्रोल टाकून जाळण्याचे दोन अज्ञात आरोपींचे हे कृत्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यात मध्ये कैद झाले आहे. असुन एक युवक हातात अवजार घेऊन परिसरात वावरत आहेत. तर दुसरा युवक गाड्यांवर पेट्रोल टाकून गाड्या जाळत असल्याचे संपूर्ण व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमे-यात मध्ये कैद झाले आहे. पेटवण्यात आलेल्या या चार दुचाकी मुळे जवळील सुर्यवंशी इंश्योरेंस याकार्यालयाचे शटर व अरोरा मशिनरी ट्रेडर्स ह्या दुकानातील साहित्यांची राखरांगोळी झालेली आहे. वेळेवर आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठीदुर्घटना टळली आहे. तर हॉटेल मध्ये मुकामी करणाºया यात्रा करू चे जीव देखील वाचले आहे. आग लागल्या नंतर पॅसिफिक होटल येथील सुरक्षा रक्षकाला काही तरी जळण्याचा वास आल्यामुळे त्यांनी बाहेर निघून बघितले असता चार ही दुचाकी धु-धु करून जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची सूचना जवळील अरोरा मशिनरी चे मालक यांना भ्रमणध्वनीवर देवून त्यांना बोलावून घेतले. तसेच आपल्या हॉटेलच्या इतर सहकाºयाना बोलावून जवळील गुजराती शाळेतील नळ व हॉटेल येथील साहित्यांच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली, असुन त्या जाळपोळ करणाºया आरोपींचा शोध आता पोलीस घेत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *