धान चोरी प्रकरणात २४ तासात तिघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान खरेदी केंद्रातील गणवीर ट्रेडर्समधून ४७ धानाचे पोते चोरीप्रकरणी शहर पोलिसांनी २४ तासात ३ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून धानाचे पोती व एक वाहन असा एकूण २ लाख ५१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संजय गणवीर यांच्या दुकानातून १३ एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तींनी ५१ हजार ४०० रुपयांचे धानाचे पोती चोरी केले होते. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास करीत २४ तासात मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन आरोपींना ताब्यात घेतले. राजकुमार शिवशंकर विश्वकर्मा (२९), संदीप सदाराम बावनथडे (26) व अतुल संतोष पारधी (२२) तिन्ही रा. सावराटोली असे आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याजवळून चोरीला गेलेले धानाचे पोते व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण २ लाख ५१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *