भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे ‘मोदी जी जबाब दो’ आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भाजपचे वरिष्ठ नेते, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटीच्या आॅफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप, भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. पुलवामा घटनेमध्ये ४० जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चुक असणे हे निदर्शनास आणून दिले असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगीतले, असाही थेट आरोप मलिक यांनी केला असूनत्यांच्या आरोपांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही उत्तर दिलेले नाही. माजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे खालील प्रश्नांवर ‘शर्म करो मोदी शर्म करो” आंदोलन आज सोमवार दिनांक १७ एप्रिल, २०२३ रोजी भंडारा जिल्हा कॉग्रेस कमिटी तर्फे आंदोलन करण्यात आले.

पुलवामा घटनेत केंद्र सरका- रची अक्षम्य चूक झाली आहे, या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सांगीतले गेले? भारतीय जवानाना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता, ती का नाकारण्यात आली ? पुलवामा घटनेत वापरले गेलेले ३०० किलो आर. डी. एक्स. कुठून आले? पुलवामा घटना व ४० जवानांचे बलिदान, हे भाजपा व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यसाठी केले होते का?श्री. मलिक यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम माधव यांनी ३०० कोटी रुपयांची आॅफर का दिली? या सर्व प्रश्नांचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे असे मोहन पंचभाई अध्यक्ष भंडारा जिल्हा कॉन्ग्रेस कमिटी सांगितले. आणि ना खाऊंगा, ना खाने दूंग गर्जना करणाºया नरेंद्र मोदी यांनी प्रश्नांचा खुलासा करुन सत्य काय आहे, ते जनते समोर आले पाहिजे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, सौ जयश्री ताई बोरकर महिला जिल्हाध्यक्ष, सभापती रमेश पारधी, सभापती मदन रामटेके, सभापती सौ स्वाती वाघाये, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, युवक काँग्रेस अध्यक्ष युवक अध्यक्ष, वाहण परिवहन सेल जिल्हाध्यक्ष शिवा गायधने, स्वाती हेडाऊ, राजेश हटवार, गजानन झंझाड,मनीषा निंबा, माजी जिप सभापती विकास राऊत, माजी अध्यक्ष भंडारा जिल्हा मच्छिमार संघ प्रकाश पाचरे, माजी अध्यक्ष पवनी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष मनोहर उरकुडकर, तालुका उपाध्यक्ष एन एस यु आय अलंकार राऊत इत्यादी उपस्थितीत होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *