लठ्ठपणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सायकल रॅलीचे आयोजन भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील आरोग्य विभागातर्फे असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक लठ्ठपणा दिवसानिमित्त दि.५ मार्च २०२३ रोजी लठ्ठपणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी या वर्षी ” चला दृष्टिकोन बदलुया : लठ्ठपणा विषयी बोलूया ” ही संकल्पना दिली आहे. या संकल्पनेनुसार लठ्ठपणा विषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. दिवसेंदिवस देशात लठ्ठपणाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे असावे . वजन मोजण्यासाठी बॉडी मास इंडेक्स काढण्यात येतो. त्यानुसार त्या व्यक्तीचा लठ्ठपणा ठरवण्यात येतो साधारणत: नॉर्मल बॉडी मास इंडेक्स हा १८ ते २४ दरम्यान असावा.

या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली ही रॅली जिल्हा सामान्य रुग्णालयातून गांधी चौक-अण्णाभाऊ साठे चौक- मुस्लिम लायब्ररी चौक-पोस्ट आॅफिस चौकजिल्हा सामान्य रुग्णालय येथे संपन्न झाली. या प्रसंगी आरोग्य विभाग जिल्हा भंडारा, आय. एम. ए. जिल्हा भंडारा आणि बायसिकल असोसिएशन आॅफ भंडारा यांनी मोलाचे सहकार्य केले. मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग, दमा, हृदय रोग या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. यावर नियंत्रण ठेवायचे असल्यास वेळेवर जेवण करणे, शारीरिक व्यायाम करणे, चिंता न करणे, फळांचे भरपूर सेवन करणे तसेच गोड व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन टाळणे, व्यसन न करणे, जेवणात मिठाचे सेवन कमी करणे, पॅकेट व जंक फूड न खाणे इ. काळजी घेतल्यास आपण लठ्ठपणा टाळू शकतो. वजन हे उंचीच्या प्रमाणात

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.