अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला विविध नेत्यांचा पाठिंबा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अंगणवाडी कर्मचाºयांना मानधन वाढ व इतर मागण्यांसाठी दि. २० फेब्रुवारी पासून आयटक व एचएमएस प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या बेमुदत संपाला दि. २४ फेब्रुवारीला पाच दिवस पूर्ण झाले असून या संपाला विविध नेत्यांनी आपला पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध पक्ष व संघटनांच्या लोकांनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला.

यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, समाज कल्याण सभापती मदन रामटेके, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती जयश्री बोरकर, महिला बालकल्याण सभापती श्रीमती स्वाती वाघाये, राष्ट्रीय मूलनिवासी संघटनेचे रविदास लोखंडे, सरयू डहाट, आशा युनियनच्या उषा मेश्राम, सुषमा कारामोरे, सुरेखा खटके, शितल रामटेके इत्यादींचा समावेश होता. अंगणवाडी कर्मचाºयांचा पुढील आंदोलन मुंबई मंत्रालयासमोर आजाद मैदानात दिनांक २७ व २८ फेब्रुवारीला असल्याने भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी दि. २६ फेब्रुवारीला मुंबईकरता प्रस्थान करीत आहेत. जोपर्यंत अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे भंडारा जिल्हा आयटकचे सचिव व युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. हिवराज उके यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *