शहापूर येथील बंदुकीच्या धाकावर अज्ञात चोरट्यांकडून तीन दुकाने .फोडण्याचे प्रयत्न

जवाहरनगर:- परिसरातील शहापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील दोन अज्ञात चोरट्याकडून बंदुकीच्या धाकावर व शस्त्रासह एक नव्हे तर तीन दुकानाचे लोखंडी सट्टर तोडून चोरी करण्याचे प्रयत्न निषफळ ठरले असून मोटारसायकलने नागपुर च्या दिशेने पळ काढल्याचे आज पहाटे ४.३०.वाजताच्या दरम्यान उघडकीस आले आहे.

शहापूर येथील गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या व हॉटेल व्यावसायिक शशिकांत शामराव राजूरकर यांचे शहापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील आठवडी बाजार व बँक ऑफ इंडिया शाखा शहापूर जवळ घर आहे.आज पहाटे दोन अज्ञात शस्त्रधारी युवक वय अंदाजे २० ते २५ वयोगट
आज पहाटे ४.३० वाजता त्यांचे घराचे लोखंडी सट्टर चे लॉक तोडत असल्याचे आवाज त्यांचे आईना आले ही बाब त्यांनी आपल्या शशी नामक मुलाला ही घटना सांगितले,घरी सी सी टिव्ही कॅमेरा असल्याने त्या कॅमेऱ्यात हे सर्व प्रकरण कैद होत होते .या घटनेची माहिती शशी यांनी गावातील आपल्या मित्रांना सांगितले, मित्र गोळा होत पर्यंत हे चोरटे येथून नागपुर च्या दिशेने मोटार सायकल नी पसार झाले,त्या पूर्वी या चोरट्यांनी गोपीवाडा रोड ग्रामपंचायत चाळ मधील विजय भोंदे यांचे डेली निडस व बेकरी दुकानाचेही लोखंडी सट्टर तोडण्याचे प्रयत्न केले .

तिथेही काही हाती लागले नसल्याने महामार्गावरील विजय हार्डवेअर लोखंडी सट्टर तोडण्याचे प्रयत्न गेले गेले हे तिन्ही प्रयत्न निष्फळ ठरले गेले .तत्पूर्वी या चोरट्यांनी नेरी येथून एक मोटार सायकल चोरून आणलेली होती.त्याच मोटार सायकल चा वापर चोऱ्या करण्यासाठी वापर केला गेला. व शेवटी ही मोटार सायकल मौदा जिल्हा नागपुर शिवारात फेकून दिले आहे अशी माहिती मिळाली
या घटनेचा तपास जवाहरनगर पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुधीर बोरकुटे हे करीत असून भंडारा येथील वरिष्ठ अधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतांनी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व ईतर वरिष्ठ अधिकारी घटना ठिकाणी भेट देऊन पुढील तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.