कोतवाल परीक्षेत कॉपी प्रकरणी भंडारा पोलिसांत गुन्हा दाखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यात कोतवाल पद भरती लेखी परीक्षेत कॉपी केल्याचे उघडकीस आल्याने तहसीलदार अरविंद लक्ष्मण हिंगे यांच्या तक्रारीवरून चार जणांवर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे की, भंडारा तालुक्यातील कोतवाल पद भरती प्रक्रीया सन २०२३ ची दि. २८ मे २०२३ रोजी लेखी परीक्षा लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे चालु होती. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील लिपीक निमेश गेडाम यांच्या भ्रमणध्वनीवर कोतवाल परिक्षेच्या प्रश्नांचे उत्तरांचे स्क्रिनशॉट प्राप्त झाले. त्यांनी याची तक्रार भंडाराचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भंडारा वकोतवाल भरती परीक्षा सदस्य अरविंद हिंगे यांच्याकडे केली.

तहसीलदार हिंगे यांनी गोपनिय माहीती काढली असता आरोपी क्र. १, चेतन ज्ञानेश्वर बावनकुळे वय १९ वर्ष रा. परसोडी / जवाहरनगर,( परीक्षेचे उमेदवार) आणि आरोपी क्र. २ राहुल बावणकुळे रा.परसोडी (उमेदवा- राचा चुलतभाऊ) तसेच आरोपी क्र. ३ सुनिल घरडे रा.परसोडी / जवाहरनगर, (अर्जनविस) आणि आरोपी क्र. ४ अरविंद धारगावे रा. बेला आणि त्यांचे इतर साथीदार यांनी संगनमत करुन, कट रचुन परिक्षेतील प्रश्नांची उत्तरे गैरमागार्ने उघड करुन, परीक्षेच्या वेळी कॉपी करण्यास आणि तोतयेगिरीकरण्याकरीता, कोतवाल परीक्षेत गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले. अप्रामाणिकपणे व गैरकायदेशिर मार्गाचा अवलंब करुन, शासकीय नौकरी मिळविण्याकरीता परिक्षेच्या उमेदवारांची तसेच, शासनाची फसवणुक केल्याने त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यातयावा असे लेखी पत्र तहसीलदार हिंगे यांनी पोलीस स्टेशन भंडारा येथे दिले. त्यानुसार आरोपींविरुद्ध कलम ४२०, ३४, १२०,(ब)भादवी सहकलम ७ महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनादीष्ट परीक्षांमध्ये होणाºया गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनीयम, १९८२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सपोनी दिपक पाटील करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *