ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीची मर्यादा वाढवा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात जावून उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र या शिष्यवृत्ती निकषात खुल्या प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा २० लाख रुपये तर ओबीसींसाठी केवळ ८ लाख रुपये उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आले आहे. ही बाब ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे निकष ओबीसींना लागू करावे अशी मागणी ओबीसीं क्रांती मोर्चा महाराष्टÑ राज्य जिल्हा भंडारा यांनी केली. आज मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती संदर्भातील आपल्या व्यथा मांडल्या. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात विजाभज, ईमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती म्हणून केवळ ५० विद्यार्थ्यांसाठी जाहिरात काढली आहे.

त्यात उत्पन्नाची मर्यादा ही आठ लाख वार्षिक एवढी ठेवली आहे. शासनाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अशाच शिष्यवृत्तीसाठी २० लाख उत्पन्न मर्यादा ठेवलेलीआहे. त्यामुळे ओबीसींसाठी उत्पन्न मर्यादा २० सोपविण्यात आले आहे. यावेळी ओबीसी क्रांती लाख करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय मते, संयोजक जीवन मोर्चा महाराष्टÑ राज्य जिल्हा भंडारा यांनी केली. तसेच परदेशी शंभर क्रमवारीतील विद्यापीठासाठी एससी प्रवर्गाला उत्पन्न मर्यादाच नाही, मग ती ओबीसींना तशीच लागू का करीत नाही? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी भजनकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू बोपचे, महिलाध्यक्ष शोभा बावनकर, तालुकाध्यक्ष सुधीर सार्वे, इंटकचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, पृथ्वीराज तांडेकर, कामेश लेंडे, कल्याणी मते, यश्ववी पंचबुद्धे, याशिका घोडीचोर, आशुतोष दृगकर आदी उपस्थित होते.

शिष्यवृत्ती क्रमवारीतही तफावत

ओबीसी विभागाने केवळ २०० क्रमवारीत परदेशी विद्यापीठांसाठी ही शिष्यवृत्ती पात्र असल्याची अट लादली आहे. परंतु अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मात्र ३०० क्रमवारीतील विद्यापीठे पात्र ठरविलेली आहे. तीच अट व सवलत ओबीसींना सुद्धा का नाही? असा प्रश्न ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित केला. उत्पन्न मर्यादा २० लाख करा परदेश शिष्यवृत्तीत ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक बाबी आहेत. त्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ओबीसी विभाग मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ओबीसीची उत्पन्न मर्यादा २० लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणी असल्याचे शेतकरी संघटनेचे बंडू बोपचे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ओबीसी क्रांतीचा मोर्चा

भंडारा : इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाकडून परदेशी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र या शिष्यवृत्ती निकषात असे आढळले की, ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला असून खुल्या प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा २० लाख, तर ओबीसींसाठी ८ लाख रुपये उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आले आहे. ही बाब ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे निकष ओबीसींना लागू करावे अशी मागणी ओबीसीं क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य जिल्हा भंडारा यांनी केली. ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्ती संदर्भातील व्यथा मांडल्या आहेत. परदेशी शंभर क्रमवारीतील विद्यापीठासाठी एससीसाठी उत्पन्न मर्यादाच नाही मग ती ओबीसींना तशीच लागू का करीत नाही?

असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात विजाभज, ईमाव व विमाप्र प्रवगार्तील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेश शिष्यवृत्तीसाठी केवळ ५० विद्यार्थ्यांसाठी जाहिरात काढली आहे. त्यात उत्पन्नाची मर्यादा ही फक्त आठ लाख वार्षिक एवढी ठेवलेली आहे तर शासनाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अशाच शिष्यवृत्तीसाठी २० लाख उत्पन्न मर्यादा ठेवलेली आहे. त्यामुळे ओबीसींसाठी उत्पन्न मयार्दा २० लाख करण्यात यावी अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य जिल्हा भंडारा यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *