समाजात ‘स्व’ जागृत करण्याचे काम संघ करतो : अतूल मोघे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अजूनही आम्ही स्वत:ला ओळखू शकलो नाही. स्वत:चे अस्तित्व विसरत चाललो आहोत. जोपर्यंत आपल्याला ‘स्व’ची जाणीव होणार नाही, तोपर्यंत आपल्याच मातृभूमीत आपल्याला डीवचण्याचा प्रयत्न होईल. स्वत:च्या अस्तित्वासाठी आपल्याला भांडावे लागत असेल तर हे आपले दुर्भाग्य आहे. या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघटीत शक्ती उभी करून करतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवाह अतूल मोघे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भंडारा नगराचा श्री विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव ९ आॅक्टोबर रोजी स्थानिक मंगलमुर्ती सभागृहात घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून मोघे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून शहरातील नामांकीत नेत्ररोगतज्ञ डॉ. योगेश जिभकाटे होते. व्यासपीठावर विभाग संघचालक राम चाचेरे, जिल्हा सहसंघचालक अनिल मेहर, नगर संघचालक पंकज हाडगे उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय नगर कार्यवाह रामकृष्ण बिसने यांनी करून दिला. मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजनझाल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी डॉ. जिभकाटे यांनी कार्याचे कौतुक करीत संघ जीवन जगायला शिकवितो, असे सांगितले. तरुणांनी दुसड्ढयांसाठी काहीतरी करण्याचा विचार डोक्यात ठेवून समाजात वावरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संघाचे कार्य कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मोघे पुढे म्हणाले, सामाजिक शक्तीची जागरण होण्याची आज गरज आहे. दुर्बलाला कोणीही मदत करत नाही, त्यामुळे दुर्बल राहून चालणार नाही. स्वत:ला सशक्त करण्यासाठी मन सुदृढ ठेवावे लागणार आहे. अनेक व्यक्ती मिळून समाज घडतो, त्यामुळे शक्तीशाली समाज घडविण्यासाठी प्रत्येकाचा हातभार महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. राष्ट्राच्या भल्यात माझे भले आहे, असा विचार करून स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव ठेवून वागणारी व्यक्ती राष्ट्र जडणघडणी महत्वाची भूमिका बजावू शकते, असेही त्यांनी सांगितले. आज आम्ही आपले कर्तव्य आणि देशाप्रतीचे जबाबदारी विसरत चाललो आहे. मातृभूमीप्रतीचा आपलेपणा लोप पावत चालला आहे. स्वत:च्याअस्तित्वाची जाणीव न राहिल्याने आजही आमच्यावर आक्रमणे होत आहेत.

जे आमचे स्व आहे, त्यावरच आघात करून आम्हाला संपविण्याचा प्रयत्न होतो आहे. अस्तित्वाची जाणीव करून देण्याची वेळ आली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच काम करतो आहे. संघटीत शक्तीच्या माध्यमातून सुदृढ समाज आणि पयार्याने विश्वगुरू भारत असे स्वप्न पूर्ण होऊ शकते. समाजात एकता निर्माण झाल्यानंतर एकसंघ समाजाचे दर्शन विघातक शक्तींना घडू शकेल. याकरिता कुटुंबापासून सुरुवात व्हायला हवी. विविध आयामांच्या माध्यमातून संघ हे काम करीत असल्याचे मोघे यांनी सांगितले. संघटीत शक्ती उभी करतानाच समाजात वाढत चाललेल्या समस्यांकडेही संघ गांभीयार्ने पाहतो. लव जिहाद ही समस्या सरकारची नव्हे तर समाजाची आहे, याचे भान ठेवून समाजाने तोडगा काढायला हवा असेही ते म्हणाले. यावेळी स्वयंसेवकांनी अमृत वचन, सुभाषित आणि वैयक्तीक गीत सादर केले. कार्यक्रमाला नगरातील गणमान्य मंडळी उपस्थित होती. उत्सव सुरू होण्यापूर्वी नगरातून संघ स्वयंसेवकांची पथसंचलन काढण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *