शेतकºयांचा सातबारा आॅनलाईन मात्र धान खरीदणार कोण?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दिवाळी नंतरही भंडारा जिल्ह्यातील जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाली नाही. धान विक्री करण्यासाठी शेतकºयांनी पोर्टलवर सातबारा आॅनलाइन केला; पण खरेदी केंद्रच सुरू न झाल्याने शेतकºयांच्या अडचणी वढल्या आहेत. तर दिवाळीनंतर आता रब्बी हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रे चालविली जातात. मागील वर्षीपासून शासकीय हमीभाव केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले.

शेतकºयांनी नोंदणी करून सातबारा आॅनलाइन केला; पण प्रत्यक्षात धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. शासनाच्या नियम व अटींमुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत येणाºया संस्थांनी अद्यापही धान खरेदीला सुरुवात केली नाही. दरवर्षी दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू करून खरेदीला सुरुवात केली जाते, त्यामुळे शेतकरी दिवाळीपूर्वी या केंद्रावर हलक्याधानाची विक्री करून दिवाळी सण साजरा करतात व उधार उसनवारी फेडतात. पण यंदा अद्यापही धान खरेदीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांची दिवाळी ही अंधारात गेली असूनरब्बी हंगामही संकटात आला आहे.

या आहेत केंद्र चालकांच्या मागण्या

धानाची घट ५०० ग्रॅमवरून ती १ किलोपर्यंत वाढवावा, पूर्वी कमिशन ३१ रुपये तेच कायम ठेवावे, धानाची उचल वेळोवेळीकरावी, ज्या भावाने धान खरेदी केले त्याच भावाने वसूल करण्यात यावे, हमाली १० रुपयांवरून १५ रुपये द्यावी, या मागण्या सोसायटीने मांडल्या होत्या.

धान पीक हाती पण विकायचे कुठे…

खरीपाचे पीक हाती आल्यावर शेतकºयाने पीक कुठे विकायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी हमीभाव केंद्र सुरु होत असल्याने शेतकरी हलक्या धानाची विक्री करुन रब्बी हंगामाच्या तयारीला लागत होते. पण यंदा धान खरेदीची समस्या कायम असल्याने शेतकºयांसमोर अडचणी निर्माण झाला आहेत. शासन आपल्या दारी अंतर्गत भंडारा महाशिबीरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.