संस्कार शिबिरात मी घडलो – डॉ.अतुल टेंभुर्णे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शालेय विद्यार्थी असताना दरवर्षी उन्हाळ्यात होणा-या संस्कारच्या नि:शुल्क शिबिरात झालेल्या विविध संस्कारांनी माझे जीवन उजळले. मी घडलो,संस्कार शिबिर एक आनंदोत्सव आहे असे विचार भंडारा येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अतुल टेंभुर्णे यांनी शिबिराच्या उद्घाटन तसेच जागतिक रेडक्रॉस दिवसाचे प्रमुख अतिथी म्हणून व्यक्त केले. या शिबिरात माजी शिबिरार्थी प्राचार्य दिपा भुरे, अ‍ॅड. वसुधा मेघरे, शिल्पा नाकतोडे, विलास केजरकर यांनी ते घेत असलेल्या समाज उपयोगी नि:शुल्क विविध उपक्रमांची माहिती दिली. अशा लोकांचा आम्हाला अभिमान वाटतो असे शिबिर संयोजक रामविलाजी सारडा म्हणाले. रेडक्रॉस दिनाचे औचित्य साधून ‘किडनी डोनर’ सुषमा मुंदडा तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ.चंद्रमोहन गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी रेडक्रॉस संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव ब्राह्मणकर, सचिव डॉ. नितीन तुरस्कर, उपाध्यक्ष डॉ.चंद्रमोहन गुप्ता, युथ रेडक्रॉसचे जिल्हा समन्वयक डॉ.हेमंत चंदवासकर, सदस्य नीलकंठ रणदिवे, श्रीमती अराठे, नरेंद्र साकुरे उपस्थित होते. संस्कार शिबिराबद्दल बोलताना जे.के. चे प्राचार्य एम.जी.कुर्झेकर म्हणाले आजच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांकरता अशा शिबिराची खूप निकड आहे. शिबिरात भंडारा गावचे साने गुरुजी राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक स्वर्गीय भास्करराव पांढरीपांडे यांच्या स्मृतिदिनी नीलकंठराव रणदिवे यांनी मार्गदर्शन केले. शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रा. वंदना मुंडासे यांनी शिबिरात मातृपितृवंदन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. समर्थ रामदास मंडळाच्या कल्याणी जोशी यांनी मनाचे श्लोक द्वारा प्रबोधन घडवून आणले.

वंशिता बन्सोडे आणि सानिया सरटकर यांनी संगीतमय योगासने करवून घेतले. योगिनी नाकतोडे नागलवाडे यांनी गीत संस्कार दिले. चित्रकला हा विषय मुकुंद बेले यांनी तर कथाकथन हा विषय प्रा. नरेश आंबिलकर आणि निळकंठ रणदिवे यांनी हाताळला. असर फाउंडेशनचे विक्रम फडके आणि वैभव कोलते यांनी शिबिरार्थ्यांना पथनाट्य शिकवले. स्काऊट गाईडचेराष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रत्नेस कोहरु यांनी रिफनॉट कृती शिकविल्या. एच.सी.एल.इन्फो मुंबईच्या मीनल चंदवासकर आणि सहाय्यक तनुजा बन्सोड यांनी सामुदायिक कृती व खेळ शिकवले. योगतज्ज्ञ गीता ईलम यांनी योगासने, डॉ. रमेश खोब्रागडे यांनी सूर्यनमस्कार शिकवले.

शिबिरात बुद्ध पौर्णिमेला माजी प्राचार्य पुरण लोणारे, सुधीर खोब्रागडे यांनी तथागत गौतम बुद्धांविषयी माहिती दिली. महाराष्ट्रातील किल्ल्याविषयीची माहिती किल्ले तज्ज्ञ अतुल गुरु,सईद शेख यांनी दिली. पौष्टिक आहार तृणधान्य याबद्दलची माहिती ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर यांनी दिली. शिबिराबद्दलच्या प्रतिक्रिया शिबिर मार्गदर्शक मोहनराव भाकरे, नगरसेविका मधुरा मदनकर, महादेव साटोने, काशिनाथ भुरे यांनी व्यक्त केल्या. संस्कार शिबिर प्रमुख महेश रणदिवे उपशिबिर प्रमुख हेमंत चंदवासकर यांनी हे शिबिर यशस्वी करून केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *