संभाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यान व कीर्तन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : एका हातात शस्त्र व दुस-या हातात लेखणी घेऊन राज्यकारभार करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. यांच्या ३७० व्या जयंती निमित्ताने त्यांच्या विचार व कार्याचा जागर करून, त्यातून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी याकरिता संभाजी ब्रिगेड भंडारा तर्फे भंडारा शहरात गुरुवार १८ मे २०२३ ला सायंकाळी सहा वाजता साई मंदिर रोड, जिल्हा परिषद चौक भंडारा. येथे व्याख्यान व मनोरंजनात्मक प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन केले आहे. जयंती उत्सवातील व्याख्यानाचे पहिले पुष्प महाराष्ट्रातील अभ्यासक व्याख्याते अनिल भुसारी हे ‘वर्तमानात संभाजी महाराजांच्या चरित्राची गरज’ या विषयावर व्याख्यान करणार आहेत.

तर दुस-या पुष्पात सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्तखंजेरी वादक पवनपाल दवंडे महाराज हे मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक किर्तन सादर करणार आहेत. आयोजकांतर्फे प्रजाहितदक्ष, राजनीतीनपुण, साहित्यिक, बहुभाषिक शूरयोद्धा असणा-या स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने जिल्ह्यातील जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, तसेच संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी, शिशुपाल भुरे, यशवंत भोयर, विश्वास बडवाईक, गणेश नंदनवार, राकेश शिंदेगणसुर, श्याम कोसरे, चंद्रकांत लांजेवार, शिल्पाताई खंडाईत, विजय बाल्पांडे, अजय गोपाले, दिनेश निंबारते, गुणवंत झंझाड, विकी ढोके अनिल झंझाड यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.