संत जगनाडे महाराज आय.टी.आय पवनी येथे तालुकास्तरीय युवा उत्सव साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पवनी आणि नेहरू युवा केंद्र, भंडारा यांचा संयुक्त विद्यमाने दिनांक १७ मे २०२३ रोज बुधवार ला संत जगनाडे महाराज आय.टी.आय पवनी येथे तालुकास्तरीय युवा उत्सव घेण्यात आला. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यापारी संघ अध्यक्ष तसेच युवाशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवराज बावनकर, कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून नितेश बावनकर, संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी चे प्राचार्य योगेश बावनकर, नेहरू युवा केंद्र, भंडारा चे समन्वयक अनिल मुंडले, निलेश सावरबांधे, नवनियुक्त भंडारा जिल्हा पोलिस कुणाल चामोर्शिकर यांचा प्रमूख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.

या तालुकास्तरीय युवा उत्सव मध्ये वक्तृत्व स्पर्धा मध्ये वैभव देशमुख, भारत मेश्राम, श्वेता खोब्रागडे, सौरभ सोनट्टके चित्रकला स्पर्धा मध्ये मयूर कुकडे, निलम दिघोरे, स्वाती तुळस्कर आणि काव्यलेखन स्पर्धा मध्ये व्यास देशमुख, नैना सावरबांधे, कुंजन तिघरे यांचा सर्वांची निवड ही जिल्हास्तरीय युवा उत्सव करीता झाली याकरिता आयोजकांनी त्यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *