प्रगती महिला कला महाविद्यालयातील विद्यार्थिनी ‘आव्हान २०२३’ राज्यस्तरीय शिबिरात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : २०२३-२४ या सत्रात ‘आव्हान २०२३’’ राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे घेण्यात आले होते. या शिबिरात प्रगती महिला कला महाविद्यालय, भंडारा येथील कु. प्राची शेंडे व कशिश शेख या दोन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. श्याम कुमार चरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रिष्णा पासवान यांनी या विद्यार्थिनींना राज्यस्तरीय शिबिरामध्ये पाठविण्याकरिता सहकार्य केले. या शिबिरात विद्यार्थिनींनी विविध आपत्तीवर मात करण्याचे प्रशिक्षण घेतले, तसेच तिथे काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी होऊन ग्रामीण जीवनशैली बद्दल आपल्या कलेच्या माध्यमातून प्रदर्शन केले. ज्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांद्वारे काढण्यात आलेल्या या रॅलीला राज्यस्तरीय शिबिराद्वारे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांच्या या यशस्वी कार्याचे महाविद्यालयातील प्रा. डॉ. जी. एन. कळंबे, डॉ. जयश्री सातोकर, प्रा. डी. डी. चौधरी, डॉ. शालिक राठोड, डॉ. ज्ञानेश्वर हिवसे, डॉ. पोर्णिमा वाहाणे, डॉ. ज्योत्सना गजभिये, प्रा. पुष्पा ठाकरे, श्री. दौलत नेवारे श्री. मनीष देशकर, श्री. संजय वानखेडे व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी अभिनंदन करून भरभरून कौतुक केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *