शासकीय कामाकरिता गौणखनिज उपलब्धतेसाठी लोकचळवळ उभारणार- चरण वाघमारे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना तसेच मनरेगा ची प्रभावी अंमलबजावणी करतांना गौणखनीज अभावी बांधकामे थांबलेली असल्याचे दिसून येते. हि विकासकामे पूर्ण करण्याकरीता शासनाने हक्काचा गौण खनिज उपलब्ध करून द्यावा जेणेकरून ग्रामपंचायतीला विकासकामे पूर्ण करता येईल अशी आपली भूमिका व मागणी असुन त्याकरीता आता लोकचळवळ निर्माण करण्याची गरज आहे. झोपलेल्या शासनाला जागे करून ग्रामीण जनतेला विकासाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी सर्व सरपंचानी शासनाकडे तशी मागणी करावी. या मागणीला घेऊन मी स्वत:तुमच्यासोबत येईल असे आश्वासन चरण भाऊ वाघमारे यांनी दिले. ८ जाने.रोजी चरण वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त तुमसर येथे आयोजित ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांच्या सत्कारावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.

चरण वाघमारे पुढे म्हणाले की, शासनाने मागील साडेचार वर्षात फक्त २ वेळा रेती घाट मंजूर केलेला असतानी साडेचार वर्षात राज्य आणि केंद्र शासनाने अब्जावधी रुपयांची विकासकामे मंजूर करून ती पुर्ण केली. रेतीघाट बंद असतांना मेट्रो प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील रेती वापरण्यात आली असेल तर मग या कामावर चोरीची रेती वापरली नाही का? हजारो ट्रक रेती भंडारा जिल्ह्यातून नागपूर ला जात असतांना त्याला कोणाचे अभय आहे. त्या रेती वाहतुकीला महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी आळा घालत नसतील तर मग कार्यवाहीच्या नावाखाली आमच्या गरीब शेतकºयांच्या ट्रॅक्टर का पकडले जातात? त्यामुळे आज प्रत्येक सक्षम अधिकाºयांनी बांधकामांना मंजुरी देतांना गौणखनीजाची तहसीलदार यांना मागणी करून राखीव कोटा ठेवून कामांना प्रशासकीय मंजुरी द्यावी. जेणेकरून विकासकामे विना अडथळा पूर्ण होतील व गावांचा विकास होईल. सरपंच / उपसरपंच/सदस्य वयक्तिक कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी, या पदावर निवडून जाताना संविधानानुसार कोणत्याही विशिष्ट पक्षाचा राहत नाही त्यामुळे गावस्तरावर कामे करतांना भेदाभेद करू नये असा सल्ला सुद्धा भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी उपस्थितांना दिला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.