सभासद, ठेवीदार व ग्राहकवर्गाच्या सहकार्यामुळे अर्बन बँक प्रगतीपथावर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दि भंडारा अर्बन को-आॅप. बँक लि भंडाराची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी लक्ष्मी सभागृह, जे.एम. पटेल कालेज रोड, भंडारा येथे दुपारी १२.०० वाजता बँकेचे अध्यक्ष नाना जैरामजी पंचबुद्धे यांचे अध्यक्षतेखाली सभासदांच्या प्रत्यक्षात सहभागाद्वारे पार पडली. फोटोच्या रुपाने गणपती, माता सरस्वती, लक्ष्मी हयांना पुष्पमाला अर्पण करून आणि दिप प्रज्वलन करुन सभेला सुरुवात करण्यांत आली. सभेच्या प्रारंभी अहवाल वर्षात दिवंगत झालेले बँकेचे सभासद देशातील गणमान्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यांत आली. त्यानंतर अध्यक्ष महोदय हयांनी सन्माननिय सभासद, ग्राहक, हितचिंतक आणि संचालक मंडळातील सहकारी या सर्वांचे परिश्रमाने, जिद्दीने सर्वांनी मन:पूर्वक सहकार्य दिल्याने बँकेची कौतुकास्पद प्रगती झाल्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानले आणि सभेमध्ये उपस्थित मान्यवर जिभकाटे जि.प. अध्यक्ष, सुनिलभाऊ फुंडे अध्यक्ष भंडारा जिल्हा सहकारी बँक, रामलालजी चौधरी अध्यक्ष भंडारा जिल्हा दुग्ध संघ, डॉ. बाळकृष्ण सार्वे अध्यक्ष भंडारा जिल्हा पतसंस्था, बाबुरावजी बागडे माजी नगराध्यक्ष न.प. भंडारा, भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ. श्रीकांतजी वैरागडे, सागरजी गणविर, योगेश हेडावू तसेच प्यारेलालजी वाघमारे भंडारा जि.प. सदस्य, नरेशजी धुर्वे संचालक दुग्ध फेडरेशन, धनराजजी साठवणे किसान सेल अध्यक्ष, नरेशजी झंझाड माजी सभापती पं.स. भंडारा, यशवंत सोनकुसरे जि.प. सदस्य, मुकेशजी बावनकर माजी नगराध्यक्ष न.प. पवनी, समशुद्दीन शेख न.प. सदस्य भंडारा, अनिलजी लांजेवार, नरेशजी ठाकरे, आशिष पात्रे, श्रीमती सुनंदा मुंडले, प्रशांतजी देशकर हयांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यांत आला. बँकेचे अध्यक्ष हयांनी अध्यक्षीय भाषणात बँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा सभेसमोर सादर केला. त्यानुसार नफा ३२.०८ लाख प्राप्त केलेला असल्याचे सांगीतले.

तसेच एप्रील २०२० ते मार्च २०२२ या दोन वर्षाचे कालावधीत बँकेने वैधानिक आवश्यक तरतुदी अंतर्गत एकूण रक्कम रु. ११९३.१२ लाख खर्च वहन केलेला असून सुद्धा ३१ मार्च २०२२ अखेर संचित तोटा रु. ४५८.३२ लाख शिल्लक असून चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मधे तो भरून निघेल आणि बँक नफ्यात येईल याची पूर्णपणे खात्री असल्याचे बँकेचे अध्यक्ष हयांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे बँकेचा संचित तोटा अद्यापही शिल्लकबाकी असल्यामुळे मान्यवर सभासदांना सन ३१ मार्च २०२२ या वर्षाचा लाभांष देता येणार नाही असे स्पष्ट करुन सभासदांना सहकार्य करण्याबाबत विनंती केली. तसेच थकबाकीदार सभासदांनी त्यांच्याकडील थकीत कर्जाची रक्कम त्वरीत जमा करण्याचे नम्र आवाहन अध्यक्षांनी केले. बँक सध्या आपले सभासद / ग्राहकांना देत असलेल्या सुविधेव्यतिरिक्त लवकरच भारतीय रिझर्व्ह बँक आणि एनपीसीआय कडून परवानगी घेवून बँकेद्वारे मोबाईल बँकींग, नेटबँकींग तसेच यासारख्या तत्सम सुविधा सुद्धा आपल्या बँकेचे सभासद / ग्राहकांना पुरविणार असल्याचे सांगीतले.

बँकेचे अध्यक्ष नाना जैरामजी पंचबुद्धे हयांनी त्यांचे संचालक कर्मचाºयांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यश प्राप्त करता आल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले. त्यानंतर विषयसुचिनुसार सर्व विषयांवर चर्चा होवून त्यात सभेला प्रत्यक्षात उपस्थित असलेल्या सभासदांनी एकमताने मंजूरी दिली. त्यानंतर सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात वर्ग १० वी च्या परिक्षेत ९०% व त्यापेक्षा जास्त आणि वर्ग १२ च्या परिक्षेत ८५% व त्यापेक्षा जास्त गुण घेवून उत्तीर्ण झालेल्या अनुक्रमे २७ आणि ९ सभासदांच्या अपत्यांचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून संचालक मंडळाद्वारे सत्कार करण्यांत आला. सभेला संचालक मंडळ सदस्य अ‍ॅड. जयंत वैरागडे (उपाध्यक्ष), धनंजय दलाल, हिरालाल बांगडकर, रामदास शहारे, पांडुरंग खाटीक, डॉ. जगदिश निंबार्ते, अ‍ॅड. सौ. कविता प्रशांतराव लांजेवार, उद्धव डोरले, महेन्द्र गडकरी, हेमंत महाकाळकर, उदय मोगलेवार, लिलाधर वाडीभस्मे, अ‍ॅड. विनयमोहन पशिने तसेच बँकेचे माजी संचालक मंडळ सदस्य विलास काटेखाये, शेखर बोरसे, धनंजय ढगे, दिनेश गिºहेपुंजे, सौ. ज्योती पुनमचंद बावनकर उपस्थित होते. विषयपत्रीकेवरील सर्व विषयांवर मंजूरी प्राप्त झाल्यानंतर आयोजीत सभेच्या सफल आयोजनाकरीता आभार मानून सभेचे कामकाज संपल्याचे बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. जयंत वैरागडे हयांनी जाहीर केले. सभेचे संचालन मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश मदान यांनी केले तर सभेचे कामकाज यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता बँकेचे अधिकारी व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *