राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – नाना गावंडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : खारघर येथे १६ एप्रिल रोजी आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान सरकारी आकडेवारीनुसार १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला तर ५०० हुन अधिक लोक जखमी झाले असुन त्यांच्यावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (कदाचित ही आकडेवारी आणखी वाढु शकते.) या घटनेला पुर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे.१३ कोटी अनेक श्रीसेवकांची प्रकृती बिघडुन त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.एवढेच काय तर कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्या व फोटो सुध्दा समाजमाध्यमातुन पुढे आले आहे.या सर्व घटनेला आयोजत राज्य सरकारच जबाबदार असुन त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे १४ श्रीसेवकांचा मृत्यू झाला तर ५०० जणांना रूग्णालयात दाखल करावे लागले हा प्रकार अत्यंत गंभीर असुन आहे.या घटनेचे राज्य सरकारला काही एक गांभीर्य नसल्याचे दिसुन येत आहे.

सरकारने मृतकाच्या वारसांना ५ लाख रूपयाची आर्थिक मदत जाहिर करून आपली सुटका करण्याचा प्रयत्न चालविला आहे.मात्र या घटनेची सत्यता सर्वांसमोर यावी व भविष्यात असा प्रकार घडुन नये याकरीता या विषयावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे करीता विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात रुपये खर्च करून एवढा मोठा भव्य-दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला मात्र कार्यक्रमस्थळी नागरीकांसाठी पुरेशा मंडप, पाणी आणि जेवणाची सोय देखील नव्हती व त्यामुळेच ही घटना घडली असुन या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या घटनेपासुन राज्य सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र या घटनेवर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी आज भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. खारघर येथील घटना अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे. याअगोदरसुध्दा अनेकदा महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले तेही कमी लोकांच्या उपस्थितीत मात्र खारघर येथे १६ एप्रिल रोजी आयोजित महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला जवळपास २० लाख लोकांची उपस्थिती होती.

सत्ताधाºयांनी केवळ स्वत:चे शक्तिप्रदर्शन व केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना खुश करण्याकरीता एवढ्या मोठया लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला असा आरोपही नाना गावंडे यांनी यावेळी करीता सत्ताधारी आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. या पुरस्कार सोहळ्यावर शासनाच्या तिजोरीतुन १३ कोटी रूपयाचा खर्च करण्यात आला मात्र करोडो रुपए खर्च करूनसुध्दा कार्यक्रमस्थळी लाखो श्रीसदस्यांना कडक उन्हात तासनतास बसावे लागले.तिथे त्यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.राज्यात उन्हाचा तडाखा सुरू असतांना श्रीसेवकांना बसण्याकरीता साधे मंडपसुध्दा तिथे लावण्यात आले नाही.आणि त्यामुळे रखरखत्या उन्हात पिण्याचे पाणी न मिळाल्याने उष्माघाताने या विषयावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे असल्याने राज्य विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी नाना गावंडे यांनी यावेळी केली.

खारघरची घटना महाराष्ट्र राज्याची मान शरमेने खाली घालणारी आहे.या घटनेतील मृत्यू ला संपुर्णपणे राज्य सरकार जबाबदार असुन राज्य सरकारचे नियोजनशुन्यतेचे उत्तम उदाहरण यातुन दिसुन येते.एवढी मोठी घटना घडल्यावर सरकार मात्र या घटनेची जबाबदारी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर ढकलत स्वत:चा बचाव करीत यावे अशी मागणी काँग्रेसची असुन तसे न झाल्यास काँग्रेस पक्षातर्पेष्ठ राज्याभर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही नाना गावंडे यांनी यावेळी सांगीतले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे,भंडारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोहन पंचभाई, प्रदेश महासचिव जिया पटेल,माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पे्रमसागर गणविर ,जि.प. शिक्षण सभापती रमेश पारधी, जि.प. समाजकल्याण सभापती मदन रामटेके, जि.प.सभापती स्वाती वाघाये,प्रशांत देशकर,अनिज जमा, मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *