गोठयाला भीषण आग ;१३ जनावरे भाजली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : जवळील देवरी/देव येथे वीज वितरण कंपनीच्या केबल जोडणीची कामे सुरू असतांना अचानक शॉटसर्किट होऊन गोठयाला भीषण आग लागली. यात गोठा जळून खाक झाला तर गोठयातील १३ जनावरे भाजल्या गेले. त्यात ८ म्हशी गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. ही जनावरे शेतकरी नामदेव ठाकरे यांची असून रविवार २३ एप्रिल रोजी रविवारी दुपारी ४ वाजता या आगीने भीषण तांडव घातला. ग्रामस्थांच्या मदतीने जनावरांना गोठयातून बाहेर काढण्यात आले. वीज वितरण कंपनीने सदर नुकसानीची शेतक-याला भरपाई द्यावी, अशी मागणीयावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली. देवरी/देव गावात वीज वितरण कार्यालय सिहोराच्या वतीने केबल जोडणीचे काम करण्यात येत होते.

दुपारी २ वाजताच्या सुमारास हे काम सुरू होते. लगतच असलेल्या शेतकरी नामदेव सैसराम ठाकरे (५०) यांच्या पाळीव जनावरांच्या लाकडी गोठ्यावरून वरून वीज तारा जोडण्यात आले आहे. केबलचे काम पूर्ण केल्यानंतर लाईनमन यांनी वीज प्रवास सुरळीत आहे किंवा नाही? हे तपासण्यासाठी ट्रान्सफॉर्मरमधून वीज प्रवाह सुरू केला असता अचानक केबल जळण्यास सुरुवात झाली व पाहता पाहता गोठयाला भीषण आग लागली. यावेळी गोठयात गायी, म्हशींसह १५ जनावरे होती. आगीचा तांडव पाहून गावकरी व लाईनमन मदतीलाधावून आले.

त्यांनी जनावरांचे दोरखंड सोडून जनावरे मुक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र जळते लाकडी मंडप जनावरांच्या शरीरावर कोसळल्याने १३ जनावरे भाजल्या गेली. यात ८ म्हशी गंभीर असल्याचे समजते. गावांच्या शेजारी असलेले पशुचिकित्सक डॉ. रमेश पारधी यांना जनावरांवर औषधोपचार करण्यासाठी बोलविण्यात आले. त्यांनी उपचार सुरू केले. परंतु काही जनावरे अधिक भाजल्याने त्यांच्या उपचाराकरिता मोठा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकरी नामदेव ठाकरे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. घटनास्थळी उपसरपंच राजेश अंबुले व सिहोरा पोलिसांनी भेट देवून पाहणी केली.

महावितरणने मदत द्यावी – ठवकर

शेतकरी नामदेव ठाकरे यांचे जनावरांचे गोठयाला विजेच्या शॉ टसर्किटमुळे भीषण आग लागली. यात ठाकरे यांच्या मालकीची १३ जनावरे भाजले असून ८ म्हशी गंभीर आहेत. महावितरणच्या कारभारामुळे हा प्रकार घडल्याने सदर शेतक-याला महावितरणने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी भारतीय किसान संघाचे मोतीलाल ठवकर यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *