तुमसर नगर परिषदेच्या आरोग्य निरीक्षकाला मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नगर परिषद येथे आरोग्य निरीक्षक पदावर कार्यरत असलेले मोहन वासनिक यांना दोन तरुणांनी नगर परिषद कार्यालयातील आरोग्य विभागात प्रवेश करून अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण करून जखमी केल्याची घटना २४ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. न प तुमसर येथिल आरोग्य विभागात ,मोहन वासनिक आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.कार्यालयात आपले कर्तव्य बजावत असताना दुपारच्या सुमारास दोन तरुणांनी न प शासकीय कार्यालयात प्रवेश करून, माज्या वडिलांना कामावर का घेतला नाही असे बोलुन भांडण करुन अश्लिल शिवीगाळ करून शर्ट कॉलर पकडुन गालावर थापड बुक्क्यांनी मारपीटकरुन जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी,आरोपी विरुद्ध तुमसर पोलीसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहान करुन अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी यश चंद्रशेखर बघेले (२७) बाबू कैलास शेंदुर्णीकर वय (१९) दोघेही रा.आझ- ाद नगर तुमसर यांच्या विरोधात कलम ३५३,३३२,२९४,५०६,३४ अंतर्गत तुमसर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून वृत्त लिहेपर्यंत आरोपिना अटक झाली नसल्याची माहिती आहे.सदर घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

नगर परिषद मधील आरोग्य निरीक्षकाला दोन तरुणा़नी मारहाण केली असुन त्यांच्या विरोधात तुमसर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात येऊन कर्मचाºयांना मारहान करणे घृणास्पद आहे. नगर परिषद अधिकारी कर्मचाºयांच्या वतीने निषेध करतो.

सिद्धार्थ मेश्राम मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद तुमसर

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.