खापा येथील धोकादायक उच्च दाब विजवाहिनीचे स्थलांतर होणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यातील मौजा खापा येथील रहिवासी ग्रामस्थांच्या घरावरून उच्च दाबाची वीजवाहिनी गेल्याने तेथील नागरिकांना किरकोळ कामे किंवा बांधकाम करता येत नव्हते. तसेच पावसाळ्यात लोकांच्या घरांना इंडेक्शन येत असून सदर वाहिनी जीवघेणी ठरत आहे. ही वाहिनी गावाबाहेर स्थलांतरित करावी, याबाबत बºयाच वर्षांपासून येथील नागरिकांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, यास प्रतिसाद मिळत नव्हता. याप्रकरणी ग्रामस्थांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांच्याकडे यासमस्येवर माहिती दिली असता याविषयी तात्काळ दखल घेत खापा येथील रहिवाशांचा धोकादायक वीजवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी महावितरण उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता अमित पाटील यांना ग्रामस्थांसह निवेदन सादर करून सदर समस्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात महावितरण ग्रामीण विभागाचे सहाय्यक अभियंता धराडे यांना याप्रकरणी मौका चौकशी करून अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश उपकार्यकारी अभियंता पाटील यांनी दिले. यामुळे ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खापा येथील रहिवासी लोकांच्या घरांच्या छतावरील विजेच्या तारांजवळून सदरची वाहिनी जात असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील ग्रामस्थांना नेहमी भीतीच्या सावटाखाली राहावे लागते.

यामुळे टेरेसवर कपडे वाळत घालताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच घराचा मजला बांधता येत नसल्याने गैरसोय होत आहे. याबाबत शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे निवेदने देऊन धोकादायक असलेली वीजवा-ि हनी स्थलांतरित करण्याची मागणी केली. बºयाच वर्षांपासून खापा येथील ग्रामस्थांना ही समस्या उद्भवत होती परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कोणत्याही प्रकारचे उपाययोजना केले जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने संबंधित अधिकाºयांना निवेदन देऊन लक्ष वेधले. आता लवकरच समस्या सोडवण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनी ग्रामस्थांना सांगितले आहे. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित पाटील यांना याविषयी निवेदन सादर करतांना स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, शाखा प्रमुख सौरभ बावणे, जगदीश हलमारे, शिवराज भोयर, खेमराज शेंडे, हेमंत हलमारे, कैलास तिजारे, जयप्रकाश हलमारे, लक्पेश ठवकर, विनोदहलमारे, अशोक रोकडे, संजय कुर्वे, तुकाराम हलमारे, संजय राखडे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *