कैलासी आश्रमात यात्रेची जय्यत तयारी

प्रतिनिधी भंडारा : तुमसर तालुक्यातील गायमुख देवस्थानात महाशिवरात्रीनिमीत्त यात्रेचे आयोजन केले जाते. यावेळी बाबा विश्वनाथ कैलासी आश्रम गायमुख देवस्थानाच्या वतीने पाच दिवसीय यात्रेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेशातील लाखो भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येतात. बाबा कैलासी आश्रमाच्या वतीने १७ ते २१ फेब्रुवारीपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. १७, १९, २०, २१ फेब्रुवारीला अन्नदान तर १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त सकाळी ५ वाजतापासून रात्री ११ वाजतापर्यंत साबुदाना फलहारी खिचडी वितरीत करण्यात येईल. आश्रमाचे अध्यक्ष दीपक सूचक यांनी सांगितले की, यावर्षी पाच दिवस संगितमय शिवपुराणाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दीपक सूचक मित्र परिवाराने केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *