बुद्ध धम्म हाच जीवन जगण्याचा उत्तम मार्ग!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर: बुद्धांनी सांगितलेले पंचशीलचे जीवनात आचरण करणे गरजेचे आहे. बुद्ध धम्म हाच जीवन जगण्याच्या उत्तम मार्ग आहे, असे प्रतिपादन तुमसर तालुका शाखाचे, भारतीय बौद्ध महा सभेचे महासचिव व तामसवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिल वासनिक यांनी केले. तुमसर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, आंबाटोली येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा तुमसर तालुका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, भीम स्मृती कार्यकारणीच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर तथागत गौतम बुद्ध यांची २५८६ वि जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी बहुजन क्रांती मंचाचे पदाधिकारी रविदास लोखंडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष विजय वाघमारे, अनिल लोनकर, उमेश मेश्राम यांनी उपस्थितांना तथागत गौतम बुद्धाच्या जीवनाच्या आधारित प्रबोधन केले. कार्यक्रमाला पूर्व नगरसेवक किशोर भाऊसागर, अलोक बनसोड, अ‍ॅड.विलास माटे, राजेश कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार निशा गणवीर यांनी केले. यानंतर शहरातील प्रमुख कार्यक्रमाचे अंतर्गत डॉ. बाबासाहेब सांस्कृतिक भवन येथे तुमसर शहरातील सर्व बुद्ध उपासक व उपासिका यांनी तथागत बुद्धाच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून पुष्पांजली अर्पित करण्यात आली व त्रिसरण- पंचशीलांचे ग्रहण करण्यातआले. यावेळी कामगार नेते बी.एम. गजभिये, जनार्दन गोस्वामी, अमरकांत कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कॅन्डल मार्च धम्म रॅलीचे आयोजन

आंबेडकर नगर आंबाटोली येथून कॅन्डल मार्च धम्म रॅलीचे प्रस्थान करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन पूर्व नगरसेवक किशोर भवसागर यांनी केले तर पंचशील झेंडाघेऊन बुद्धम् शरणम् गच्छामि म्हणत शहरात पदार्पण करण्यात आली. यावेळी चोखामेळा बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी व रविदास नगराचे उपासीका संघटन, मालवीय नगर बौद्ध समिती, बजाज नगर महिला बुद्ध संघटन यांनी रॅलीचे पुष्प वर्षाव करून स्वागत केले. रॅलीचे समापन गौतम व गांधीनगर येथील संघाराम बुद्ध विहारात करण्यात आले. याप्रसंगी हजारो लोकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

कॅन्डल मार्च धम्मरॅली धम्मदैली यशस्वी करण्याकरिता राजकुमार रामटेके, संदीप रामटेके, प्रकाश चव्हाण, अनिल वैद्य, अनिल चव्हाण, संदीप नागदिवे, बालू माटे, अनिल बोंबार्डे, आकाश खोब्रागडे, विकास नागदेवे, नितेश गजभिये, हर्षल घोडीचोर, राधेश्याम घोडीचोर, राजु गजभिये, राजेश कांबळे, किशोर माटे, अतुल बडगे, चेतन मेश्राम, राजेंद्र गोंडाणे यांनी अथक परिश्रम घेतले. दाखवून धम्म रॅलीचे प्रारंभ विलास माटे यांच्या हस्ते करण्यात आले. शहरांच्या प्रमुख मार्गाने रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये तथागत भगवान बुद्ध यांनी पंचभिक्षुंना प्रथम उपदेश देताना झांकी काढण्यात आली. या रॅलीत अंगुलीमाल व गौतम बुद्धांची झाकी लोकांना आकर्षित करीत होती. या रॅलीमध्ये बौद्ध उपासक व उपाशीका यांनी हातात कॅण्डल

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.