१९ ला आदिशक्ती शितला माता मंदिरात शनिदेव जयंती व नवग्रह उत्सव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : खामतलाव येथील श्री आदिशक्ती शितला माता मंदिर येथे शुक-्रवार दि. १९ मे २०२३ ला श्री. आदिशक्ती शितला माता मंदिरात शनिदेव जयंती व नवग्रह उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खामतलाव येथील मंदिरात शनिदेव जयंती व नवग्रह उत्सवा दरम्यान दुपारी ४ वाजता अभिषेक होणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता शितला माता मंदिर येथे आरती होणार आहे. तरी भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शनिदेव जयंती व नवग्रह उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन शितला माता मंदिराचे कोषाध्यक्ष धनराज धुर्वे व शितला माता मंदिर देवस्थान समितीच्या पदाधिकाºयांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *