‘त्या’अंगणवाडी मदतनिसच्या कुटूंबियांना आर्थिक मदत द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लाखांदूर तालुक्यातील मासाळ येथील कमल विजय गोंधळे वय ४७ वर्ष या अंगणवाडी मदतनीसच्या मृत्यूला शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार असुन मृतकाच्या कुटूंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच मृतकाच्या पतीला शिपाई पदावर शासकीय सेवेत सामावुन घ्यावे अशी मागणी राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाचे ‘शरद पवार गट’ यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातुन केली आहे. दिनांक ८ जानेवारी २०२४ ला मृतक या सुमारे ४ वाजता एसटी बस क्रमांक एम एच ४० किंवा ६२५६ ने भंडारा बस स्थानक इथुन काही अंगणवाडी कर्मचाºयांसह बसमध्ये बसने प्रवास करीत होते. दरम्यान एसटी बस श्रीनगरच्या जवळपास येताच बस ने उसळी घेतली त्यात मृतकाच्या डोक्याला मार लागल्याने त्या बसमध्येच पडल्या.

एसटी बसच्या चालकाने तात्काळ बस प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे आणले मात्र प्रकृती अतिशय गंभीर असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला इथून अ‍ॅम्बुलन्सने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणण्यात आले आणि सुमारे पाचच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे डॉक्टरांनी जखमी मदतनीस ला मृत घोषित केले. अंगणवाडी मदतनीस कमल गोधळे यांच्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अपघाती मृत्यु झाला असुन मृतक अंगणवाडी मदतनीस हिच्या कुटूंबियांना जिल्हा परिषदेच्या वतीने तत्काळ आर्थिक मदत जाहिर करण्यात यावी तसेच त्यांच्या पतीला चपराशी या पदावर शासकीय नोकरी मध्ये रुजू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भंंडारा जिल्हयाच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष किरण अतकरी,मोहाडी तुमसर विधानसभा अध्यक्ष तथा जि.प. सदस्य एकनाथ फेंडर ,जि.प.सदस्य नरेश ईश्वरकर, तालुका अध्यक्ष ईश्वर कळबे, ओबीसी जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे, भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *