जिल्ह्यात पीओपी मूर्तीची विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील पीओपी मूर्तींवरील खरेदी-विक्रीवरील बंदी नियोजनाबाबत व शासनाच्या सलोखा योजनेबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर परिषद, जिल्हा परिषद यांची आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीपती मोरे, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपस्थित होते. जिल्ह्यात पीओपी मूतीर्ची विक्री करताना कुणी आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

पीओपी मूर्तींवर बंदी असल्याचे ग्रामीण भागामध्ये गावपातळीवर प्रसिध्दी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी अधिकाºयांना दिले. एका शेतकºयाच्या ताब्यातील शेतजमीन दुसºया शेतकºयाच्या नावावर असल्यामुळे जे अनेक प्रश्न निर्माण होतात ते सोडविण्यासाठी सलोखा योजना महत्वाची ठरत आहे. एका शेतकºयाच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसºया शेतकºयाकडे व दुसºया शेतकºयाच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकºयाकडे असणाºया शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये आणि नोंदणी शुल्क नाममात्र एक हजार रुपये आकारण्यात येणार आहे. सलोखा योजनेत अर्ज केल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी १५ दिवसात पंचनामा करणे आवश्यक आहे, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीपती मोरे यांनी यावेळी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *