अंधश्रध्दा निर्मूलनासाठी जनप्रबोधन मोहिम राबवा

दै. भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील वाढत्या अंधश्रद्धांच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन जनप्रबोधन मोहिमेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाºयाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी आकाश आवतारे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्ह्यात अंधश्रध्देमुळे मोठमोठ्या घटना घडल्या आहेत. यात अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत नवेगाव (कोका) येथे एका महिलेची जादूटोणा केल्याच्या आरोपावरून हत्या झाली. लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत पोहरा या गावी भूतबाधेच्या नावावर मोठया प्रमाणात अंधश्रध्देला खतपाणी घालण्यात आले होते. साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत वळद येथे अंधश्रध्देमुळे घर जळत असल्याचे प्रकार घडले. भंडारा जिल्हा हा धान पिकाचा जिल्हा असून जिल्ह्यात साप चावून मरणाºयांचे प्रकार मोठया प्रमाणात आहे.

हे प्रकार अज्ञान आणि अंधश्रध्दमुळे घडत आहेत. एखादया व्यक्तीस साप चावला की त्याला गावातील देवळात नेतात बाºया बोलतात, तंत्र मंत्र करुन त्या व्यक्तीला गावठी औषधी देतात. ढोंगी बुवा बाबाच्या नावाचे पाणी करुन पाजत राहतात यातच वेळ निघून जातो आणि विषारी साप चावलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. बिनविषारी साप चावला असेल तर त्याचा जीव वाचतो. समाजात बिनविषारी साप कोणता आणि विषारी साप कोणता याची ओळख नाही. साप चावल्यावर प्रथमोपचार काय करावे याबाबत लोकांना माहिती नाही. साप चावल्यावर अंधश्रध्देला बळी पडून भोंदू बाबाच्या नादी लागून जीव गमवत आहे. यासाठी जनजागृती करणे अत्यंत महत्वाचे आहे. साप कोणीतरी पेसला आहे असे म्हणून गावात मारामाºया होतात व वेळप्रसंगी खूनही घडतात. अंधश्रध्देमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत व बळी जात आहेत ही दु:खद बाब आहे. भंडारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा प्रसार व प्रचार अंमलबजावणी जिल्हा समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीव्दारे लोकांमध्ये असलेली अंधश्रध्दा दूर व्हावी व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ ची अंमलबजावणी व प्रसार व प्रचार करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, संजय कटारे, दशरथ शहारे यांनी निवेदनातून केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *