आवडीला परिश्रमाची जोड मिळाल्यास यश मिळतेच -अतुल परशुरामकर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दहावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन करून पाच वर्ष प्रचंड मेहनत घेतल्यास त्यांचे पुढील आयुष्य सुखकर होईल. आवडीला परिश्रमाची जोड दिल्यास निश्चितच यश मिळते असे प्रतिपादन अतुल्य शिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल परशुरामकर यांनी केले. ते सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. नारायणा आय.ए.एस.अकॅडमी व सार्वजनिक वाचनालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअरच्या वाटा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह डॉ. जयंत आठवले हे होते. प्रमुख वक्ते म्हणून नारायणा आय.ए.एस. व अतुल्य शिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल परशुरामकर,नारायणा आय.ए.एस.अकॅडेमीच्या लीना पांडे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अतुल परशुरामकर पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी व पालकांनी दहावीनंतर आपल्याला कोणत्या वाटा निवडायच्या यासाठी माहिती घेणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहेत याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जयंत आठवले यांनी विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमतांची जाणीव करून घेऊन जीवन जगण्याचा योग्य मार्ग निवडावा असे सांगितले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या स्पधेर्तून प्रथम येणाºया विद्यार्थ्यांला २००१ रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय ढगे, शेखर गभने, घनश्याम कानतोडे, दिनेश हरडे, सुधीर खोब्रागडे, महेश साखरवाडे, युवराज साठवणे यासह सर्वांनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *