सर्वसाधारण घरच्या या मुलाला पदरात घेवुन आशिर्वाद द्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: आधी दोन शक्ती एकमेकांविरोधात लढत होत्या. आज त्या एकत्र आल्या मुळे आपली ताकद भक्कम झाली आहे. नितीनजी नंतर विदर्भात विक्रमी मतांनी निवडून येणारा खासदार सुनील मेंढे असेल. दिल्लीचा पाच वषार्चा असलेला अनुभव पुढील पाच वर्षातही मतदारसंघाच्या कायापालटासाठी महत्त्वाचा ठरेल. सर्वसाधारण घरच्या या मुलाला पदरात घ्या आणि आशिर्वाद द्या असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. १९ मार्च रोजी होणाºया भंडारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज भाजप महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी आयोजित आशीर्वाद सभेत राज्याचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. प्रफुल्ल पटेल, आ. नरेंद्र भोंडेकर व महायुतीतील मान्यवर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.