आज नाना पटोले यांची तिरोडा येथे प्रचारार्थ सभा

भंडारा पत्रिका / तिरोडा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची आज दिनांक २८ रोजी संध्याकाळी ५ वाजता जुने नगरपरिषद कार्यालया तिरोडा समोर महाविकास आघाडीचे भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचे प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेस नानाभाऊ पटोले यांचे सह लोकसभेचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे, गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिलीप भाऊ बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रविकांत बोपचे ,काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी राधेलालजी पटले प्रामुख्याने उपस्थित राहणार असून या सभेस तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते , महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तिरोडा शहर अध्यक्ष पवन मोरे यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.