सोनी येथे एफएसटी व एसएसटी च्या पथकाकडुन १ कोटी ७६ लाख रुपये जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- सध्या विदर्भामध्ये चार जिल्ह्यांमध्ये लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका आहेत त्यानिमित्त गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी लावण्यात आली होती अशाच गोरेगाव सोनी येथील नाक्यावर आज एफएसटी व एसएसटी टीमने यांनी संयुक्त कार्यवाही करत १ कोटी ७६ लाख रक्कम जप्त केली. गोंदिया येथून डिझायर कार ने गोंदिया ते ठाणा ते गोरेगाव असा प्रवास करत असताना सोनी येथे सदर कारची चौकशी केली असता या कारमधून एक कोटी ७६ लाख रुपये रक्कम कार मध्ये ठेवल्याचे दिसून आले. यावेळी तहसीलदार किसन भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा ,रक्कम सील करणे तसेच पंचनामा एरटर अँप वर भरून तसेच इतरकार्यवाही केली. पोलीस निरीक्षक अजय भुसारी व पोलीस सब इन्स्पेक्टर घोलप यांनी कायदेशीर कार्यवाही केली. तसेच तहसीलदार गोमासे मॅडम तसेच निवडणूक निर्णय अधीका- री पूजा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.