घर,आस्थापना व बाजारात मतदार जागृती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात मतदारात जागृती करण्यासाठी स्वीप सेलच्या वतीने शहरातील घरोघरी तसेच आस्थापना, दुकान व बाजारात जाऊन नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वीप सेलच्या नोडल अधिकारी शिखा पिपलेवार व स्विप जिल्हा पथकाने नगरपरिषद परिसरात, बाजारापेठ तसेच सार्वजनिक स्थळी लोकांना भेटून १९ एप्रिलला होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच श्रीनगर, बाजपेयी वार्डात परिसरात घरोघरी भेट देवून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले व पोस्टर वाटप करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.