दुर्गंधीयुक्त कचºयामुळे गांधीसागर तलावाचे अस्तित्व धोक्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषद हद्दीतील गांधीसागर तलावाचे पाणी दुगंर्धीयुक्त कचºयामुळे प्रदूषित होत आहे. जीवजंतू व जनावरांच्या पिण्याच्या प्रश्न लक्षात घेता याकडे जिल्हा पातळीवरील अधिकाºयांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे. भंडारा जिल्हा तलावाच्या जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. शहरातील काही ठिकाणी लहान-मोठी तलाव असल्यामुळे संकटसमयी तलावातील पाण्याच्या वापर करण्यात येतो. उन्हाळ्यात शहरातील विहिरीची पाण्याची पातळी सतत वाढून ठेवण्यासाठी गांधीसागर तलाव अतिशय महत्त्वाचा ठरते. मात्र शहरातील प्लास्टिक कचºयामुळे गांधीसागर तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. तुमसर शहरामधील लोकवस्तीच्या मध्यभागी असलेल्या नगरपरिषदेच्या गांधीसागर तलावात अनेक वर्षांपासून कचºयाचे ढिगारे फेकले जातात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि वाहनचालकांना दुगंर्धीचा सामना करतच मार्गक्रमण करावे लागतो. यामध्ये गांधी सागर तलावाभोवताल आवार भिंत तयार करणे, तलावातील गाळ उपसून तलाव सौन्दर्यकरण करणे यासाठी नगरपरिषदेने डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट (DDR) तयार करून शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात यावे अश्या मागण्या यापूर्वी अनेकदा नगरपरिषदेकडे करण्यात आले होते. मात्र कित्येक वर्षे लोटूनही आश्वासनांची पूर्तता होऊ शकली नाही ही अतिशय शोकांतिका आहे.

यासंदर्भात नगरपरिषद प्रशासकाकडे वारंवार पत्रव्यवहार करून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केल्या जात नसल्याने शहरातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. बºयाच वर्र्षापासून नगरपरिषद व शासनाकडे गांधीसागर तलावाच्या सौंदर्याकरणाची मागणी केली होती. परंतु, आश्वासनाशिवाय कोणतीही कार्यवाही झाली नाही. तलावाचे सौंदर्गीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे, तलावात जात असलेल्या कचºयाला अडवून पाणी प्रदूषित होण्यास आळा घालण्यात यावा, अशी मागणी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, दिपक मलेवार, स्वप्निल बडवाईक, शाखा प्रमुख योगेश चिंधालोरे, रोशन ढोके, राकेश इंगळे, रविंद्र महाकाळकर, जयेश डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते भूषण सानेकर यांनी नगरपालिकेचे प्रशासक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावनंदर यांच्याकडे केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.