सिव्हील लाईन घरफोडीतील चोरट्याला अटक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : ६ गोंदियातील सिव्हिल लाईन रहिवासी फिर्यादी मो. जाफर मो. आमीन कंडुरेवाला(४५), रा.सिव्हील लाईन हे ९ मार्च २०२४ रोजी गोंदिया हे बाहेरगावी गेले असता त्यांचे राहते घराचे समोरील दाराचा कोयंदा तोडुन घरात प्रवेश करुन आलमारीत ठेवलेले सोण्याचे दागिणे ५५ तोळे व रोख रक्कम अज्ञात चोराने चोरुन नेल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप क्र.१२०/ २०२४ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवी कलमान्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्ह्याचा तपास सपोनि सोमनाथ कदम हे करीत आहेत. पो.नि.श्री चंद्रकांत सुर्यवंशी पोलीस स्टेशन गोंदिया शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोमनाथ कदम व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळ परीसरातील सी.सी.टी. व्ही. फुटेज व गोपनिय सुत्राच्या आधारे आरोपी साहील उर्फ माट्या राजु आंबेकर रा. विठ्ठल मंदौर वार्ड, निबांळकर वाडी चंद्रपुर याने चोरी केल्याचे निष्पन्न केले. प् ोलीसांनी वर्धा रेल्वे पोलीस स्टेशन येथे जावुन खुनातील अटक आरोपी साहील उर्फ माट्या राजु आंबेकर याचेकडे कसुन व शिताफीने तपास केला. तसेच आरोपीचे राहते घराची चंद्रपुर येथे जावून झडती घेवुन फिर्यादी यांचे घरामधुन चोरीस गेलेले मुद्देमालापैकी सोन्याचे कंगन २ जोडी, सोन्याचे बांगड्या ८ नग, सोन्याचे झुमके १ जोडी, सोन्याचे झुमके १ नग, सोन्याचे अंगुठी ७३ नग, सोन्याचा हार ३ नग, सोन्याचा चैन २ नग, सोन्याचे पॉलीश केलेले ३ नग हार, सोन्याचे पॉलीश केलेले आंगठी १ नग, सोन्याचे पॉलीश केलेले झुमके, ६ नग पांढºया रंगाचा बेनटेक्स च्या आंगठ्या असा एकुण १५ लाख ३३ हजार रुपयाचे दागिने हस्तगत केले.

गोंदिया शहर पोलीसांनी केलेल्या कामगीरीचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कौतुक केलेले आहे. तसेच संपुर्ण गोंदिया शहरातील नागरीक पोलीसांच्या कामगीरीची प्रशंसा करीत आहेत. आपले चोरीस गेलेले दागीने परत मिळाल्याचे समजताच फिर्यादीचे चेहºयावरील आनंद गगणात मावेनासा झाला होता. सदरची कामगीरी गोंदियाचे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, नित्यानंद झा अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्रीमती रोहीणी बानकर उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सोमनाथ कदम, सपोनि विजय गराड, पो.हवा जागेश्वर उईके, दिपक रहांगडाले, सुदेश टेंभरे, कवलपालसिंग भाटीया, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, निशिकांत लोंदासे, पोहवा. रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक राहांगडाले, मुकेश रावते, कुणाल बारेवार यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.